मुख्यमंत्री दुष्काळाबाबतील गंभीर नाहीत

सुप्रिया सुळे यांचा आरोप : निवारणासंदर्भात सरकार उदासीन

पुणे- सध्या राज्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र अन्य पक्षातील कोणाला भाजपत आणायचे हेच सुचत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. या परिस्थितीत मुख्यमंत्री दुष्काळाबाबतीत अजिबात गंभीर नाहीत, अशी टीकाही सुळे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या संविधान बचाव, देश बचाव सभेनंतर खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार उदयनराजे यांचे स्वागत करण्याला आम्ही उत्सुक असून, राष्ट्रवादीचे आणखी काही नेते आमच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर त्या बोलत होत्या.

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीवर काय उपाययोजना करायच्या, नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या दुष्काळाच्या झळा कमी कशा कराव्यात, हा विचार सोडून मुख्यमंत्री आपला वेळ राजकारणासाठी आणि पक्षात कुणाला आणायचे, यावर खर्च करत आहेत. त्यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीशी आणि जनतेशी काही देणे घेणे नाही. दुष्काळ निवारणासंदर्भात सरकार उदासीन आहे, अशी टीका करत आपण सर्वांनी दुष्काळ निवारणासाठी नैतिक जबाबदारी म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन सुळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)