मुख्यमंत्री घेणार कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

जिल्हानिहाय दौरा सुरू : जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू

पुणे – प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, दुष्काळी परिस्थितीसह शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या बैठकीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय दौरे सुरू केले असून यामध्ये त्यांच्या प्राधान्याच्या असलेल्या योजनांचा आढावा घेत आहे. यापूर्वी पुणे विभागातील सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत त्यांनी बैठका घेतल्या आहेत. लवकरच ते पुणे जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेणार आहेत. ही बैठकीची तारीख कधीही ठरू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे.
आगामी वर्ष हे निवडणुकीचे आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचतात की नाही. विविध विकास कामांमध्ये कोणते तालुके मागे आहेत. पंतप्रधान आवास योजना शहरी व ग्रामीण भागात दिलेले उद्दिष्ट व एकूण पूर्ण झालेल्या घरांची संख्या यांचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. जिल्ह्यातील सर्वात कमी उद्दिष्ट पूर्ण केलेले तीन गटविकास अधिकारी याबाबतची कारणे स्पष्ट करणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सर्वात कमी उद्दिष्ट पूर्ण केलेले तीन तालुके यांचा आढावाही मुख्यमंत्री घेणार आहेत. मुद्रा योजनेंतर्गत बॅंकेत सादर करण्यात आलेले कर्ज प्रकरणे, ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते याच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यामध्ये राबविलेले दोन वैशिष्ट्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प यांचाही आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)