मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून राज्यातील प्रत्येक तालुक्यात रस्ते – पंकजा मुंडे

मुंबई -राज्यातील प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते देण्यात आले आहेत, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.सदस्य डॉ. संतोष टारफे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुंडे बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामाची त्रिस्तरीय तपासणी केली जाते. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा विकास नियोजन निधीतून कोणत्याही रस्त्यावरचा निधी कमी केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप वळसे पाटील, सुभाष पाटील यांनी भाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)