मुखवासाचे मुख्य प्रकार – विडा

विडा

साहित्य

नागवेलीची पाने (त्यालाच विड्याची पाने म्हणतात) काताच्या गोळ्या, चुना, बडीशेप, बारीक किसलेले कोरडे खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी अथवा कातरलेली सुपारी.

कृती

प्रथम ओलसर कपड्यावर विड्याची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात. साधारणत: एक विडा दोन पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत, त्याच्या दुप्पट पाने जोडीने मांडावीत, नंतर पानाला थोडा थोडा चुना लावावा. प्रत्येक पानावर 2/3 कात गोळ्या, लहान चमचाभर सुपारी, वेलदोड्याचे 6-8 दाणे, लहान चमचाभर बडीशेप व 1 चमचाभर ओले खोबरे किंवा कोरड्या खोबऱ्याचा कीस घालावा. नंतर पानाची पुडी करून त्याला लवंग टोचावी.

सुजता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)