मुखवासाचे मुख्य प्रकार : गोविंद विडा

गोविंद विडा

साहित्य

नागवेलीची पाने, (त्यालाच विड्याची पाने म्हणतात.) काताच्या गोळ्या, चुना, बडीशेप, बारीक किसलेले खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी अथवा कातरलेली सुपारी.

कृती

प्रथम ओलसर कपड्यावर विड्याची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात, साधारणत: एक विडा पाच पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत, त्याच्या पाचपट पाने घ्यावीत. एका विड्याची पाने घेऊन त्यांना प्रथम चुना लावावा. एका पानाचा द्रोणासारखा आकार करून त्यात 2/3 कात गोळ्या, लहान चमचाभर सुपारी, वेलदोड्याचे 6-8 दाणे, लहान चमचाभर बडीशेप व 1 चमचाभर ओले खोबरे किंवा कोरड्या खोबऱ्याचा किस घालावा. नंतर हे पान चारीबाजूंनी दुमडून त्रिकोणी आकार द्यावा. नंतर हा त्रिकोण वर येईल अशा तऱ्हेने हे दुमडलेले पान दुसऱ्या पालथ्या पानावर ठेवावे व प्रथम लांबीच्या बाजूने पाने दुमडून घ्यावीत, नंतर रुंदीच्या बाजूने दुमडावीत. याचप्रकारे पाच पाने एकावर एक ठेवून मोठा त्रिकोण तयार होतो, या दुमडी निघू नयेत म्हणून सपाट बाजूने लवंग टोचावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)