मुखवासाचे मुख्य प्रकार : आवळा सुपारी

आवळा सुपारी

साहित्य

250 ग्रॅम डोंगरी आवळे, अर्धा चमचा काळ्या मिऱ्यांची पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, 2 लिंबाचा रस.

कृती

मोठे डोंगरी आवळे धुऊन, पुसून स्टीनलेस स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. (साध्या किसणीवर किसल्यास आवळे काळे पडतात.) नंतर त्यात मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालून कालवावे. नंतर त्यावर 2 लिंबाचा रस घालावा आणि हा कीस उन्हात वाळत घालावा. ही सुपारी पाचक असून उपवासाला चालते आणि मुलांनादेखील फार आवडते.

सुजता टिकेकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)