मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमात जाण्याला कॉंग्रेस नेत्यांचा विरोध

हैदराबाद – माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याला कॉंग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. संघ जातीयवादी संघटना असल्यामुळे मुखर्जी धर्मनिरपेक्षतेच्या हितासाठी यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभेतील माजी खासदार व्ही. हनुमंथा राव यांनी म्हटले आहे. मुखर्जी यांनी संघाच्या निमंत्रणाबाबत फेरविचार करावा, अशी विनंती आपण त्यांना करणार असल्याचेही राव यांनी म्हटले
आहे.

प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याप्रमाणे युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही मुखर्जी यांच्याबद्दल नितांत आदर आहे. संघाची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे. संघ धर्मनिरपेक्ष नाही. संघाला हिंदुराष्ट्र निर्माण करायचे आहे. तेथे मुखर्जी कसे काय जाऊ शकतात? त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत फेरविचार करावा, असे राव यांनी म्हटले आहे.

संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला प्रमुख अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती या नात्याने प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुखर्जी यांनी निमंत्रण स्वीकारल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आनंद व्यक्‍त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)