शिक्रापूर- मुखई (ता. शिरुर) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदीरात चोरी झालेल्या घटनेला एक महिला उलटून देखील झालेल्या चोरीचा तपास लागला नसल्याने मंदीरात उपोषणास बसणार आहे, असा इशारा 86 वर्षीय माजी सरपंच शिवाजीराव सदाशीवराव पलांडे यांनी दिला आहे.
मुखई (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात 29 एप्रिल रोजी चोरी झाली होती. यावेळी झालेल्या चोरीमध्ये मंदिरातील देवाचे सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने आणि वस्तू चोरीला गेले आहेत. या घटनेला एक महिना होत असताना देखील या चोरीचा तपास करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आलेले नाही. तसेच माजी सरपंच शिवाजीराव पलांडे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये एक वर्षापूर्वी माजी सरपंच स्वाती धुमाळ यांच्या घरात तर, सहा महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत सदस्या सुनिता सरमाने यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. या घटनेचा देखील अद्याप तपास लागलेला नसल्याचे म्हटले आहे. शिक्रापूर पोलीस तपासाबाबत उदासीन असल्याचे म्हटले जात आहे. या घटनांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे आहे. तरी शिक्रापूर पोलिसांनी मुखई मंदिरातील चोरीच्या तपासाला गती देऊन एक जूनपर्यंत चोरीचे प्रकरण उघडकीस आणावे, अन्यथा सहकाऱ्यांसह मंदिरात उपोषणाला करणार असल्याचा इशारा 86 वर्षीय माजी सरपंच शिवाजीराव सदाशीवराव पलांडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)