मुखई भैरवनाथ मंदिरातून दागिने गायब

शिक्रापूर-मुखई (ता. शिरूर) येथील भैरवनाथ मंदिरातील पुजारी मंदिराबाहेर झोपलेला असताना चोरट्याने पुजाऱ्याच्या उशीची चावी काढून घेऊन 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या सुमारे दहा किलो चांदी व पितळेचे सुमारे पाच किलो वजनाचे देवाचे दागिने रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
याबाबत गोपाल पांडुरंग पुजारी (वय 25, रा. मुखई, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे व्यवस्थापक गोपाल पुजारी हे शनिवारी रात्रीच्या सुमारास मंदिर बंद करून घरी गेले. त्यावेळी मंदिरातील सर्व दागिने व साहित्य व्यवस्थित होते, त्यानंतर रात्रीच्या सुमारास पुजारी हे मंदिराच्या ओट्यावर येऊन झोपले. त्यावेळी त्यांच्या शेजारीदेखील अजून दोन-तीन ग्रामस्थ झोपले होते. झोपताना पुजारी यांनी मंदिराच्या दरवाजाची चावी त्यांच्या उशीखाली ठेवली होती. पहाटेपर्यंत चावी त्यांच्या उशीखाली होती; परंतु पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने येऊन पुजारी यांच्या उशीची चावी काढून घेतली. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप उघडून देवाच्या चार किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, दोन किलो वजनाचा चांदीचा दोन फणी नाग, तीन किलो वजनाचे चांदीचे त्रिशूल, अर्धा किलो वजनाचा चांदीचा नाग, अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या वाट्या तसेच दोन किलो वजनाची पितळी पिंड, दोन किलो वजनाचे पितळी नागाचे वेटूळे तसेच देवाचा पितळी गोल मुखवटा असे साहित्य चोरी करून नेले.
आज (रविवारी) पुजारी हे जागे झाले असता त्यांना चावी दिसली नाही, तसेच मंदिराच्या दरवाजाचे कुलूप उघडलेले दिसून आले. आतमध्ये पहिले असता देवाच्या मूर्तीशेजारील काही वस्तू व दागिने गायब झाले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी गावातील काही व्यक्तींना बोलावून मंदिराची पाहणी केली. आजूबाजूला पाहणी शोध घेतला असता काहीही आढळून आले नाही. त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात माहिती देताच आज उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस हवालदार प्रल्हाद सातपुते आदींनी मंदिराला भेट दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे हे करीत आहेत.

  • मुखई येथे मंदिराच्या पुजाऱ्याच्या उशीला ठेवलेली चावी काढून घेऊन देवाचे दागिने चोरी गेल्याची घटना घडली आहे. सध्या या भागात चाऱ्यांना पाणी आले असल्याने नागरिक रात्रीच्या सुमारास शेतात जात असतात; परंतु नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. आपापल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
    -अतुल भोसले, सहायक पोलीस निरीक्षक
  • नावे नसलेल्या दागिन्यांची व वस्तूंची चोरी
    मुखई मंदिरातील चांदीच्या दागिन्यांची व वस्तूंची चोरी चोरी करताना चोरट्याने दागिन्यांवर व वस्तूंवर नावे नसलेल्याच चांदी व पितळाच्या वस्तू चोरी केल्या. ह्या वस्तूंवर व दागिन्यांवर नाव आहे, अशा कोणत्याही वस्तू चोरी केल्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात अजूनही खळबळ उडाली आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)