मुक्‍त शिक्षण विद्यालयांचा खेळाडू, कलाकारांना फायदा

शिक्षणमंत्री : इयत्ता पाचवी व आठवीसाठी ऑनलाइन प्रवेश सुरू

पुणे – राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या मुक्‍त शिक्षण विद्यालय मंडळामुळे खेळाडू, कलाकरांना पुढील शिक्षणासाठी चांगला फायदा होऊ शकेल, असा विश्‍वास शालेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे व्यक्‍त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र राज्य मुक्‍त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ मुक्‍त विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी स्वराली जोगळेकर, पाखी जैन व विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंखी, राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे उपस्थित होते.

विनोद तावडे म्हणाले, मुक्‍त शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र हे इतर मंडळांच्या समकक्ष असणार आहे. मुक्‍त शिक्षण मंडळासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे आव्हानात्मक काम पार पाडले आहे. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत ठरवून दिलेलेच विषय शिकले पाहिजेत असे नाही. विद्यार्थ्याला भाषा, संगीतही शिकता आले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्या साचेबद्ध शिक्षणात अडकवले आहे, त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.

आपला अभ्यासक्रम औद्योगिक क्रांती नंतरच्या काळावरच अडकून पडला आहे, त्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना घोकमपट्टीपासून दूर करण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामध्ये बदल करून कृतिपत्रिका आणण्यात आल्या, असे तावडे यांनी सांगितले. यावेळी मुक्‍त शिक्षण मंडळाच्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. शंकुतला काळे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक भोसले यांनी आभार मानले.

मुक्‍त शिक्षण मंडळामध्ये सूचनांचे स्वागत
मुक्‍त शिक्षण मंडळाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, मुक्‍त शिक्षण विद्यालय मंडळाची आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये सुधारणा, बदल करण्याबाबत पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था यांनी सूचना कराव्यात. मुक्‍त विद्यालय मंडळाकडून या सूचनांचे स्वागत केले जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)