“मुक्‍तांगण’मधून डॉक्‍टरांच्या कला-गुणांचे दर्शन

पिंपरी – डॉक्‍टरांचे मन मुळातच सृजनशील असते. पण, रोजच्या व्यस्त दिनक्रमामुळे कित्येक गोष्टी मनात असूनही त्या प्रत्यक्षात उतरविणे शक्‍य होत नाही. या सुप्त गुणांना योग्य संधी मिळाली तर या संधीचे ते सोने करू शकतात. याची प्रचिती नुकतीच आली. निमित्त होते “मुक्तांगण’ या डॉक्‍टरांनी डॉक्‍टरांसाठी राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच घेतलेल्या साहित्य-कला संमेलनाचे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजतर्फे डॉक्‍टरांसाठी “मुक्तांगण 2018′ हे दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील साहित्य-कला संमेलन भरविण्यात आले होते. संमेलनाचे उद्‌घाटन डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवसीय संमेलनात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, सुमित्रा भावे, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. यशराज पाटील, संचालिका स्मिता जाधव, कुलगुरु डॉ. पी. एन. राझदान, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, खासदार शांतनु सेन, आयएमएचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांची उपस्थिती होते.

संमेलनातील “काव्यांजली’ कवी संमेलनात युवा डॉक्‍टरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. डॉक्‍टरांवरील वाढते हल्ले, त्यावरील उपाययोजना, प्रेम, विडंबन जनजागृती या विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. डॉक्‍टरांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. संमेलनापूर्वी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, आगाशे यांची “चित्रपट कसे बनवावेत’ या विषयावरील कार्यशाळा झाली.

या संमेलनात डॉ. कमलेश बोकील यांचे गिटार वादन, डॉ. डसमित सिंग यांचे वाद्य वादन, डॉ. सुप्रिया गाडेकर व डॉ. नंदन यार्डी यांचा ऑर्केस्ट्रा मधील सहभाग, डॉ. सतीश डके यांचे छायाचित्र व पेंटिंग प्रदर्शन, डॉ. आरती निमकर, गिरीजा वाघ व डॉ. राधिका परांजपे यांचे शास्त्रीय नृत्य, डॉ. संजय पाटील आणि डॉ. पद्मा अय्यर यांचे बॉलिवूड नृत्य, डॉ. सरोज पांडे यांचे शास्त्रीय गायन आणि डॉ. मंदार परांजपे यांनी सादर केलेली “मी लॅब टाकली’ ही एकांकिका वैशिष्ट्यपूर्ण ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)