मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा

पणजी : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहतासोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्यात आले आहे.  त्याचे काही फोटो सध्या लिक झाले आहेत.

आकाश आणि श्लोकाच्या प्री एंगेजमेंट सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाहुणे गोव्यात दाखल झाले होते. मुकेश अंबानींसह त्यांचे कुटुंब गोव्यात उपस्थित आहे. फक्त कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची तीन मुले आहेत. ज्यामध्ये आकाश सर्वात मोठा, तर अनंत अंबानी आणि ईशा त्यांची बहिण आहे. आकाश अंबानींचा रिलायन्स जिओच्या मंडळामध्येही समावेश आहे. कार्यक्रमानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आले. तर अंबानी कुटुंबीयांनी डान्सही केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)