मुंब्य्रात बोगस कॉल सेंटर उघडकीस 

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे पोलिसांनी एक बोगस कॉल सेंटर उघडकीला आणले आहे. हे कॉल सेंटर दोन अमेरिकन औषध कंपन्यांना सेवा देण्यासाठी उघडण्यात आले होते. अमृतनगर भागातून हे कॉल सेंटर चालवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल वशिद कादरी चौधरी नावाच्या एका इसमाला अटक केली आहे. हे कॉल सेंटर विना परवाना चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली. गुरूवारी सकाळी सहा वाजता या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी स्वत: चौधरी हा तेथील तीन कर्मचाऱ्यांना काहीं सूचना करीत असल्याचे आढळून आले.
नियमीत फोन लाईन्स ऐवजी व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल या सेवेचा वापर करून विदेशातील नागरीकांशी तेथून संपर्क साधला जात होता. त्याच्या बरोबरच ज्या तीन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांना त्याने तेथे प्रत्येकी बारा हजार रूपयांच्या पगारावर कामाला ठेवले होते. अमेरिकन कंपनीच्या नावाने अमेरिकेतील नागरीकांना फोन करून त्यांची व्यक्तीगत माहिती मिळवत आणि ही माहिती ते संबंधीत औषध कंपन्यांना पुरवत. त्याद्वारे त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. पुढील तपास सुरू आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)