मुंबई हिरे बाजारात 2000 कोटीचे मनी लॉंडरिंग रॅकेट उघड – चौघांना अटक

मुंबई – डीआरआय (महसूल गुप्तचर संचलनालय) ने मुंबईत बीडीबी (बॉंबे डायमंड बोर्स) येथे 2,000 हजार कोटी रुपयांचे मनी लॉंडरिंग रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यंनी दिली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बीडीबीच्या बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्‍सवर टाकलेल्या धाडीनंतर हे रॅकेट उघड झाले. या धाडीत मालाची एक कन्साईनमेंट पकडण्यात आली.

156 कोटी रुपये दर्शनी किमतीचे हिरे असलेली ही कन्साईनमेंट उघडून पाहिल्यानंतर त्यात केवळ 1.2 कोटी रुपये किमतीचे हलक्‍या प्रतीचे कच्चे हिरे मिळाले. हिरे तज्ज्ञांनी या कन्साईनमेंटमधील हिऱ्यंचे मूल्यांकन केल्यानंतर ही गोष्ट उघड झाली. निर्यातदारांच्या संमतीने हे हिरे हॉंगकॉंग, दुबई अशा परदेशी बाजारपेठंतून आणले होते. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून 10 लाख रुपये रोख आणि 22 कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जप्त करण्यात आले. सोबत चेक बुक्‍स, आधार कार्डस आणि पॅन कार्डसही जप्त करण्यात आलेली आहेत.

बीडीबीचे उपाध्यक्ष मेहूल शाह यांनी या रॅकेटमुळे धक्का बसल्याचे संगितले आहे. हिऱ्यांची किंमत करणारे कस्टम विभागाबरोबर काम करतात आणि तेथे व्यवसायातील कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने मूल्यांकनकर्त्यांना मान्यता देण्याचे काम स्वत:च करावे असे जीजेईपीसी (जेम्स अँड ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमिशन कौन्सिल) ने सरकारला सुचवलेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)