मुंबई सेंट्रलला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे’ नाव द्या : रामदास आठवले

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ मुंबईत घालवला आहे. त्यामुळे येथील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  नाव देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.


मोदी सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदासआठवलेंनी मुंबई सेंट्रल स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी केली. तसेच लवकरच मी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, दादर स्थानकाचंही नामकरण चैत्यभूमी स्थानक असे करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)