मुंबई विमानतळावर 29 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

सौदीहून आलेल्या एका भारतीयाला अटक

मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टमच्या कारवाईत 29 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. रियाधहून आलेल्या विमानातून सोन्याची बिस्किटे आणल्याप्रकरणी मोहम्मद अल्ताफ मोईदिन या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
सौदी अरेबियातील रियाधहून आलेले जेट एअरवेजचे विमान मुंबई विमानतळावर उतरले. मुंबईमार्गे हे विमान मंगळुरुला जाणार होते. त्यापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मदकडे असलेली 1160 ग्रॅम वजनाची दहा सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. दहा सोन्याच्या बिस्किटांची किंमत 29 लाख 68 हजार 585 रुपये असल्याची माहिती आहे. चार सोन्याची बिस्किटे एलईडी इमर्जन्सी लाईटमध्ये भरुन आणली होती, तर उर्वरित सोन्याच्या बिस्किटांवर काळी पट्टी चिकटवण्यात आली होती. मोहम्मदला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)