मुंबई विमानतळावरील प्रवेश शुल्क दहा दिवसात बंद करा : शिवसेना

मुंबई : मुंबई विमानतळावर प्रवेश शुल्क वसुलीबाबत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कारण येत्या दहा दिवसात टोल वसुली बंद करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करु, असा इशारा शिवसेनेने एअरपोर्ट ऑपरटिंग कंपनी जीव्हीकेला दिला आहे.
मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एन्ट्री फीच्या नावाखाली 130 रुपये वसूल केले जातात. त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही. आत शिरताच तुमच्यावर टोलसक्ती लागू होते. मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलेच उत्तर नसते. संपूर्ण देशात फक्त इथेच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास भांबुरकर यांनी केला आहे. दरम्यान, या सर्व आरोपांवर जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एन्ट्री टोल घेतला जातो असे म्हटले आहे. तसेच एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार जीव्हीकेकडे आहेत. प्रवाशांसाठी खास इलेव्हटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एन्ट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जात असल्याचे जीव्हीके कंपनीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)