मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाची निवडणूक; युवासेनेचे सर्व उमेदवार विजयी

मुंबई – मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडली होती. या  निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या  युवासेनेनं निर्विवाद वर्चस्व मिळवत 10 पैकी 10 जागांवर विजय मिळवला.

या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दणदणीत पराभव करत  युवासेनेनं विजयी पताका फडकावली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अभाविपच्या उमेदवारांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झालाय. या जबरदस्त विजयाचा शिवसेना भवनात जल्लोष होताना दिसत आहे. दरम्यान, लवकरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सर्व विजयी उमेदवारांसह पत्रकार परीषद घेणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)