मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुहास पेडणेकर

मुंबई : रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत करण्यात आली आहे.

कुलगुरुपदासाठी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांचे नाव आघाडीवर होते. अखेर त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड  करण्यात आली आहे. रुईयाला मिळालेला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आणि सत्ताधारी पक्षाशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. डॉ. पेडणेकर यांनी विद्यापीठ प्रशासनावर कधीही काम केलेले नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी ते किती सक्षमपणे पार पाडतात हे येत्या काळात समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)