मुंबई विद्यापीठाच्या कायदेशीर सल्लागार पॅनेलवर अक्षय गोसावी

वडूज – नायकाची वाडी (ता. खटाव) येथील ऍड. अक्षय मदन गोसावी यांची मुंबई विद्यापीठाच्या कायदेशीर सल्लागार पॅनेलवर नियुक्ती झाली आहे. अक्षय हे बेंगलोर येथील कंपनी न्याय प्राधिकरणाचे न्यायाधीश मदन भालचंद्र गोसावी यांचे सुपूत्र आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयात गेली 14 वर्षे वकिलीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी विविध सहकारी संस्था, शिक्षक संघटना तसेच खासगी दिवाणी, फौजदारी दावे यशस्वीपणे चालवून दुष्काळी भागातील लोकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

अक्षय गोसावी यांच्या मुंबई विद्यापीठाच्या कायदेशीर सल्लागार पॅनेलवर नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, प्रा. उर्मिला जाधव, वडूज वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. नितीन गोडसे, तसेच सहकारी पदाधिकारी, सुधाकर जाधव व नायकाची वाडी परिसरातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)