मुंबई विद्यापीठाचे ऍप लॉंच

विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशापासून परीक्षेच्या तारखांसह अनेक सुविधा
मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या वतीने शुक्रवारी “मुंबई-ई-सुविधा’ नावाचे ऍप लॉंच केले आहे, मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या टप्यात 6 लाख विद्यार्थी तर 791 महाविद्यालयांस जलद संवादाचे माध्यम म्हणून विद्यापीठाने हे मोबाईल ऍप लॉंच केले. या ऍपचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ऍपद्वारे प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉलतिकीट अशा सुविधाही या ऍपद्वारे दिल्या जाणार आहेत. महाविद्यालय विद्यार्थ्यास विविध सूचना या ऍपमार्फत पाठवू शकणार आहेत. मुंबई विद्यापीठसुद्धा महाविद्यालयास विविध सूचना या ऍपद्वारे पाठवू शकते. तसेच महाविद्यालयास या ऍपमधून प्रवेश आणि परीक्षा संबंधाची सर्व माहिती मिळते. यामुळे कॉलेज व विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या विविध सूचना तात्काळ प्राप्त होतील.

-Ads-

“मुंबई-ई-सुविधा’ हे मोबाईल ऍप अँड्रॉइडधारकांसाठीच उपलब्ध आहे. प्लेस्टोअरमधून सर्वांना हे ऍप Mum-e-Suvidha या नावाने डाऊनलोड करता येईल. विद्यार्थांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन हा 16 अंकी क्रमांक त्याचा युजर आयडी असेल आणि पासवर्ड कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्याना मिळणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)