मुंबई :…म्हणून ‘त्या’ १४०० कामगारांना कामावरून काढलं

 मुंबई : कंत्राटी कामगार म्हणून हातापोटावरचे जगत असलेल्या तब्बल १,४०० कंत्राटी सफाई कामगारांच्या नावात स्पेलिंगच्या चुका झाल्याने मुंबई महापालिकेने कामावरून काढण्याची कारवाई केली. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

पालिकेत अनेक वर्षे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम केल्यानंतर सन २०१४मध्ये औद्योगिक न्यायालयाने २,७०० कंत्राटी सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यास पालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवल्याने २७००पैकी १६०० कामगारांची कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी पडताळणी झाली.

न्यायालयाने नेमलेल्या तपासणी अधिकाऱ्यांमार्फत पॅनकार्ड व आधारकार्डाच्या आधारे कामगारांची नावे निश्चित करण्यात आली. तसे करताना तब्बल १४०० कामगारांचे नाव, वडिलांचे नाव किंवा आडनावात स्पेलिंगच्या चुका आढळल्याचा दावा करत पालिकेने त्यांना सेवेतून कमी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)