मुंबई मॅरेथॉनला “गोल्ड लेबल’ दर्जा

मुंबई: यंदाची टाटा मुंबई मॅरेथॉन 20 जानेवारी 2019 रोजी रंगणार आहे. मुंबई मॅरेथॉनचे उत्कृष्ट संयोजन, अव्वल आंतरराष्ट्रीय धावपटूंचा प्रतिसाद आणि सेलेब्रिटींसह सुमारे 46 हजार धावपटूंचा प्रतिसाद यामुळे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने या स्पर्धेला अत्यंत प्रतिष्ठेचा “गोल्ड लेबल’ दर्जा देण्याची घोषणा आज केली आहे.

विशेष म्हणजे पुढच्या वर्षारंभी होणारी 16वी मुंबई मॅरेथॉन ही देशातील सध्याची एकमेव गोल्ड लेबल मॅरेथॉन ठरणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनल यांनी दिली आहे. तब्बल चार लाख पाच हजार डॉलर पारितोषिक रक्‍कम पणाला लागणार असलेल्या या मॅरेथॉनमध्ये जगभरातील आघाडीच्या मॅरेथॉन दावपटूंसह देशभरातील सर्वोत्तम धावपटूही सहभागी होत असतात.

भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अदिल सुमारीवाला यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि मुंबई मॅरेथॉनच्या संयोजनात वाटा उचलता येणे आपल्यासाठी व आपल्या सहकाऱ्यांसाठीही अभिमानास्पद असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)