मुंबई बाद फेरीत पोहचण्याची शक्‍यता कमी

मुंबई: बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण सामना असल्याने मुंबई संघाने गतविजेत्या सौराष्ट्र संघासमोर चौथ्या दिवशी विजयासाठी 72 षटकांत 285 धावांचे आव्हान ठेवले होते. त्यात मिनाद मांजरेकरच्या भेदक गोलंदाजी करुनही मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागला.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अ’ आणि ब’ या एकत्रित गटात मुंबईचा संघ आता एकूण 11 गुणांसह 14 व्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.सकाळच्या सत्रात मुंबईने 5 बाद 175 धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. केला. त्यात 63 धावांची भर घातली आणि 8 बाद 238 धावांवर दुसरा डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्रने 7 बाद 266 धावा केल्या. सौराष्ट्रला विजयासाठी 19 धावा कमी पडल्या आणि हा सामना अनिर्णीत राहिला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)