मुंबई पोलिसांनी ट्विटरवरुन कुणाल खेमूला ई-चलान पाठवले !

मुंबई : आपल्या अनोख्या पण दमदार ट्वीट्समुळे मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाऊंट कायम चर्चेत असते. आता मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमूला ट्विटरवरुनच ई-चलान पाठवले आहे. हेल्मेटशिवाय बाईक चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याला ई-चलान पाठवले आहे.

कुणाल खेमू हेल्मेटशिवाय बाईक चालवत असल्याचा फोटो एका ट्विपले पोस्ट केला होता. या ट्वीटमध्ये त्याने मुंबई पोलिसांनाही मेन्शन केले. कुणालला ई-चलान मिळायलाच हवे, असे त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते. मुंबई पोलिसांनी याची दखल घेत, कुणाल खेमूला ई-चलान पाठवले. शिवाय चलानचा फोटोही ट्विटरवर शेअर केला. तुमच्या ट्वीटने आमच्या लक्षात आणून दिले. ई-चलान नंबर MTPCHC1800225825 संबंधिताला पाठवले आहे, असे पोलिसांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. “मी हे फोटो पाहिले, प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ते फारच लाजिरवाणे आहेत. मला बाईक्स आवडतात आणि दररोज चालवतो, हेल्मेट घालून. नेहमीच हेल्मेट घालावे, मग तो जवळचा प्रवास असो वा लांबचा प्रवास. मी माफी मागतो. मला चुकीचं उदाहरण बनायचे नाही,” असे ट्वीट कुणालने केले.

“कुणाल खेमू तुला बाईक्स आवडतात, आम्हाला आमच्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षा. हळहळ व्यक्त केल्याने दुर्घटना टळल्या असत्या तर बरे झाले असते. ह्याची जाणीव पुढच्या वेळी घटना घडून गेल्यावर होणार नाही, अशी आशा. ई-चलान इथून पाठवलं आहे,” असे उत्तर पोलिसांनी कुणाल खेमूला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)