मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये 36 लाख वाहने…

मुंबई – राज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. मुंबईसारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही.

यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवित असून आणखी प्रयत्न केले जात आहेत, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)