मुंबई, पुण्यात दहशतवादी हल्ला करण्याचा सनातन संस्थेचा कट : एटीएस

मुंबई – मुंबई, पुणेसहित अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट सनातन संस्थेने केल्याचा खळबळजनक खुलासा दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोषरोपपत्रात केला आहे. नालासोपऱ्यात जप्त करण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणी एटीएसने आज विशेष न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले. पहिल्यांदाच एटीएसने सनातन संस्थेचे नाव अधिकृतरीत्या घेतले आहे.

एटीएसने म्हंटल्यानुसार, आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जागृतीसारख्या संघटनेचे सदस्य होते. सनातन संस्थेने प्रकशित केलेल्या ‘क्षात्रधर्म’ पुस्तकात दिल्याप्रमाणे हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने प्रेरित झाले होते. आणि एक समविचारी तरुणांची टोळी तयार केली. हे तरुण तथाकथित हिंदू धर्म, परंपराविरुद्ध बोलणे आणि लिहिणाऱ्यांना ते लक्ष्य करत होते. यासाठी पिस्तूल, बॉम्बचा उपयोग करून दहशत निर्माण करण्याचा कट तयार केला होता.

पुण्यात झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आणि बेळगावातील चित्रपटगृहात घातपात घडवण्याचाही कट असल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली आहे. परंतु, सनातन संस्थेने या आरोपींशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर हे चौघेही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या चौकशीसाठी शरद कळसकरला सीबीआयने एटीएसच्या ताब्यात दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)