मुंबई-पुणे सायक्‍लॉनचा दिलवान ठरला विजेता 

संदेश उप्पर ठरला घाटाचा राजा 
पुणे – मुंबई-पुणे सायक्‍लॉन 2018 या स्पर्धेत दिलवान हा विजेता ठरला यावेळी कृष्णा न्यावोडी याने दुसरा क्रमांक पटकावला. तर संदेश उप्परयास घाटाचा राजा हा बहुमान मिळाला.
मुंबई-पुणे दरम्यान पार पडलेल्या सायक्‍लॉन 2018 या स्पर्धेत दिलवान याने मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 3 तास 47 मिनीटांमध्ये पार करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. तर स्पर्धेत कृष्णा न्यावोडी याने हे अंतर 3 तास आणि 48 मिनीटांत पार करत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या संदेश उप्परला घाटाचा राजा हा बहुमान मिळाला.
संदेशने मुंबई-पुणे मधिल घाट सर्वात वेगाने पुर्ण केल्याने त्याला हा मान देण्यात आला. त्याने हे अंतर 3 तास 48 मिनीट आणि 35 सेकंदात पुर्ण केले. तर अरवींद पवारला स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळाला. त्याने हे अंतर 3 तास 48 मिनीट आणि 36 सेकंदात पुर्ण केली. तर किशोर जाधव आणि रोहतास कुमार यांनी अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)