मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवी सुविधा

मुंबई : मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एक नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल काही प्रमाणात का होईना कमी होणार आहेत.
शनिवारी आणि रविवारी प्रवशांना रस्त्यावरच्या वाहतूकीची विद्यमान स्थिती एसएमएसवर मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरातून निघण्याआधीच वाहतुकीची स्थिती समजू शकणार आहे. महामार्ग पोलीस यासंदर्भातल्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ही सुविधा सुरु करणार आहेत. त्यासाठी वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष यंत्रणा बसवली जाईल. जेणेकरून वाहन चालकांना वाहतूक कोंडीविषयी तातडीने माहिती देण्यात येणार आहे. क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्वयंचलित यंत्रणा कार्याविन्त करण्यात येणार असल्याचे MSRDC च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)