मुंबई, दिल्लीत औद्योगिक कॉरिडॉरला चालना 

एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी 1029 कोटींची तरतूद 
नवी दिल्ली – हरियाणा राज्यातील नांगल चौधरी गावात 886.78 एकर परिसरात एकात्मिक बहु-आयामी लॉजिस्टिक केंद्र म्हणजेच माल गाव विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. विशेष हेतूसाठी विकसित तत्वावर आधारित हा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाईल. या प्रकल्पासाठी, पहिल्या टप्यात 1029.49 कोटी रुपये निधी तर दुसऱ्या टप्प्याला आज तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी न्यास या प्रकल्पात 763 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील. तसेच, इंधनबचत, रोजगार निर्मिती, निर्यातीला चालना, वाहन खर्चात बचत, प्रदूषणबचत असे अनेक फायदे या प्रकल्पामुळे होणार आहेत. एकात्मिक बहु-आयामी लॉजिस्टिक केंद्रामुळे चार हजार थेट तर सहा हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने संरक्षण सेवांसाठी पर्यायी संचार नेटवर्क उभारण्यासाठी स्पेक्‍ट्रम नेटवर्क प्रकल्पाचा खर्च 11,330 कोटी रुपयांनी वाढवायला मंजुरी दिली. पायाभूत विकाससंबंधी मंत्रिमंडळ समितीने जुलै 2012 मध्ये
13334 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या प्रकल्पाची अंमलबजावणी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) करत असून, 24 महिन्यात पूर्ण केला जाईल. नेटवर्क फॉर स्पेक्‍ट्रम प्रकल्पामुळे संरक्षण दलांच्या संचार क्षमतांमध्ये वाढ होईल आणि राष्ट्रीय परिचालन सज्जताही वाढेल. यामुळे संरक्षण विभागातील संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम होण्यास मदत मिळणार असल्याचे सरकारच्या प्रवक्‍त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)