मुंबई : झाडाची फांदी डोक्यावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

संग्रहित फोटो

मुंबई : झाडाची फांदी डोक्यावर पडून एका ९१ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी वाळकेश्वरमध्ये घडली. सुखी लीलाजी असं मृत महिलेचं नाव आहे. सुखी लीलाजी फेरफटका मारण्यासाठी बाणगंगा तलावाजवळ गेल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची फांदी त्यांच्यावर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

उपचारांसाठी त्यांना गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुखी लीलाजी यांच्या डोक्याला दुखापत झाली तसंच त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्यामध्ये झालेल्या दुखापती व रक्तस्त्रावामुळे मंगळवारी त्यांचा  सकाळी मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)