मुंबई – गोवा मार्ग धावणार आणखी सुसाट

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागून असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरच होण्याची चिन्हे आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत माहिती दिली आहे. हा रस्ता २०१९ पर्यंत सुसाट धावेल, असे घडकारी म्हणाले.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील बहुतेक अडथळे दूर झाले आहेत. मुख्य अडथळा जमिन संपादनाचा होता तोही दूर झाला आहे. त्यामुळे मार्च, २०१९ पर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी केली. मुंबई – गोवा जलवाहतुसाठीही आपण प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशी कंपनीला त्याचा आरखडाही तयार करण्यास सांगितले आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)