मुंबई इंडियन्सच्या संघातून 10 खेळाडूंना डच्चू ; आगामी मोसमासाठी 18 खेळाडू संघात कायम 

मुंबई: आयपीएलच्या 11 व्या मोसमात मुंबई इंडीयन्सला अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मुंबईने आगामी 12व्या मोसमासाठी संघामध्ये भरपूर फेर बदल केले असून मुंबईने नविन मोसमात तब्बल 10 खेळाडूंना करारातून मुक्त केले आहे. तर, 18 खेळाडूंना संघात कायम राखले आहे.

करार मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये जे.पी. ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिझुर रेहमान आणि अकिला धनंजयया विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या मोसमात पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता तर ड्युमिनी आणि मुस्तफिझूरयांना आपल्या कामगिरीतून विशेष चमक दाखवता आली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांना संघातून डच्चू देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. तर, गत मोसमात संमिश्र कामगिरी करणाऱ्या कायरन पोलार्द आण्इ मेचेल मॅकलघनला यंदाही मुम्बईने संघात कायम राखले आहे.

-Ads-

2019 आयपीएल मोसमा साठी मुंबई इंडियन्सने संघात कायम राखलेले खेळाडू – 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ.

2019 आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू – 
सौरभ तिवारी, प्रदीप सांगवान, मोहसीन खान, एमडी. निधेश, शरद लुंबा, तेजिंदर सिंह धिल्लॉं, जे.पी.ड्युमिनी, पॅट कमिन्स, मुस्तफिजूर रेहमान, अकिला धनंजया

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)