मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार – मुख्यमंत्री

मुंबई : ज्या ज्या देशात बुलेट ट्रेनचे प्रकल्प झाले आहेत तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार असून हा प्रकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य संजय दत्त यांनी मुंबई-अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन विषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दळणवळण व्यवस्था (मोबिलीटी) हा विकासाचा मार्ग आहे. जिथे जिथे फास्ट ट्रेन गेली आहे तेथील विकासदरात वाढ झाली आहे. याच दृष्टीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान सरकार कर्ज देणार आहे. 50 वर्षांसाठी जपान सरकारने अर्ध्या टक्कापेक्षा कमी दराने बुलेट ट्रेनसाठी कर्ज दिले आहे. सुरुवातीची 20 वर्षे कुठलेही व्याज द्यावे लागणार नाही. भविष्यात मुंबई- पुणे व राज्यातील इतर ठिकाणीही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतल्या लोकलसाठी पाहिल्यादाच अर्थसंकल्पात 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवाश्यांच्या सुरक्षा, उपाययोजना यासाठी हे पैसे देण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचे तिकीट हे रेल्वे तिकीटाएवढेच राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)