मुंबईहून थेट विमान : भारत-इंडोनेशिया यांच्यात मैत्रीचे आणखी एक पाऊल

मुंबई : गेल्या काही महिन्यांत भारत आणि इंडोनेशिया यांच्यात मैत्रीचे नवीन पर्व सुरू झाले आहे. दोन्ही देशांत विकासाच्या दृष्टीने अनेक करार झाले आहेत. त्यात दोन्ही देशांतील पर्यटन वाढीवर भर देण्यात आला आहे. त्याचा आणखी एक टप्पा नुकताच सुरू झाला आहे.

इंडोनेशियातील बाली येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. मात्र इतके दिवस मुंबईहून बाली येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नसल्याने अनेकांचा हिरमोड होत होता. आता त्यावर उत्तर सापडले असून ‘इंडोनेशिया-गरुडा’ एअरलाईन्सने मुंबई-बाली अशी थेट विमान सेवा सुरू केली आहे.

ही सेवा सुरू झाल्याची माहिती इंडोनेशियातील भारतीय दुतावासाने ही माहिती दिली आहे. या सेवेमुळे दोन्ही देशांतील संस्कृती आणखी जवळ येतील, असेही दुतावासाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)