मुंबईवरील हल्ल्यानंतर नौदल आता पूर्ण सुसज्ज

नौदल प्रमुखांनी दिली माहिती

मुंबई – मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्त नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, या हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय नौदलाने सागरी हद्दीच्या सुरक्षेसाठी परिपूर्ण तयारी केली असून आम्ही आता अधिक सुसज्ज स्थितीत आहोत. ते म्हणाले की, मुंबई हल्ल्याच्या घटनेनंतर आम्ही आता खूप पुढे आलो आहोत.

-Ads-

त्यांनी सांगितले, सागरी तटरक्षक यंत्रणा आम्ही आधिक सक्षम करताना त्याठिकाणी विविध पदरी यंत्रणा कार्यरत केल्या आहेत. आता ही तटरक्षक यंत्रणा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करणे आता कोणालाही तितके सोपे राहिलेले नाहीं. पाकिस्तानच्या दहा हल्लेखोरांनी सागरी मार्गाने मुंबईत येऊन तेथे मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या या हल्ल्याला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहेत. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या पार्श्‍वभूमीवर बोलताना नौदल प्रमुख म्हणाले की भारतीय तटावरील धोकादायक ठरणाऱ्या भागावर अधिक लक्ष केंद्रीत करून आम्ही ती नाकी बंद करून टाकली आहेत.

संपूर्ण सागरी तटांच्या परिसरात एकूण 42 रडार स्टेशन्स उभारली असून या सर्वांचा एक नियंत्रण कक्ष गुडगाव येथे उभारण्यात आला आहे. तो कार्यरत झाला आहे. रडार स्टेशन्स मध्ये उच्च रिझोल्युशन्सचे कॅमरे तैनात करण्यात आले असून त्यांची क्षमता दहा सागरी मैलावरील हालचाली टिपण्याची आहे असे ते म्हणाले. तटवर्तीय भागात अशी आणखी 38 रडार निरीक्षण केंद्रे उभारली जात आहेत. भारताला तब्बल 7500 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. तेथे चोवीस तास पहारा ठेवणे ही जिकरीची बाब आहे पण त्याबाबतीत आता नौदलाने पूर्ण दक्षता बाळगली असल्याची माहिती नौदल प्रमुखांनी दिली. या सागरी हद्दीत मच्छिमारांचे एकूण 1500 लॅंडिंग पॉईन्ट आहेत. त्या सर्व स्थळांवरही काटेकोर पहारा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)