मुंबईला पावसाने झोडपले, सर्वत्र पाणीच-पाणी

मुंबई – शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पश्‍चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. आजचा पाऊस हा 2005 नंतरचा सर्वाधिक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परेलच्या केईएम रुग्णालयात पाणी घुसले आहे. 24 तासांमध्ये 154 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)