मुंबईला जमशेदपूरचा दोन गोलांसह धक्का

                  मुंबई- हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात जमशेदपूरएफसीने आपल्या मोहिमेची जोरदार सुरवात केली. मुंबई सिटी एफसीला दोन गोलांनी धक्का देत त्यांनीप्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर अभेद बचावाच्या जोरावर ही कामगिरी साकार केली. अंधेरीतील मुंबई फुटबॉलएरीनावर सुमारे आठ हजार प्रेक्षकांत बहुसंख्य समर्थक मुंबईचे होते, पण त्यांना हताश व्हावे लागले.

मारिओ आर्क्वेसने 28व्या मिनिटाला जमशेदपूरचे खाते उघडले. त्यानंतर भरपाई वेळ सुरु होईपर्यंत जेरीस आलेल्यामुंबईला बदली खेळाडू पाब्लो मॉर्गाडो याच्या गोलमुळे दुसरा धक्का बसला.

-Ads-

जमशेदपूरने गेल्या मोसमात आयएसएल पदार्पण केले. त्यांचे बाद फेरीतील स्थान थोडक्यात हुकले होते. त्यांचा संघ पाचवा आला होता. 18 सामन्यांत केवळ 18 गोल पत्करलेल्या जमशेदपूरचा बचाव लक्षवेधी ठरला होता. प्रतिस्पर्ध्याच्या गोलची संख्या बेंगळुरू एफसीची सर्वांत कमी 16 अशी होती. त्यानंतर जमशेदपूर दुसऱ्या क्रमांकावर होते. या मोसमातही जमशेदपूरने आपले बलस्थन कायम राखले. त्यांच्या बचावफळीच्या अथक प्रयत्नांसमोर मुंबईला घरच्या मैदानावर निर्णायक प्रयत्न करता आला नाही.

सामन्याच्या प्रारंभी काही सकारात्मक चाली रचलेल्या जमशेदपूरला 28व्या मिनिटाला फळ मिळाले. मारिओ आर्क्वेस याने उजवीकडून बॉक्सच्या दिशेने मुसंडी मारत कार्लोस कॅल्वोला पास दिला. डावीकडील कार्लोसने तिरकस पास पुन्हा मारिओच्या दिशेने दिला. त्यावर मारिओने अचूक हेडिंग करीत मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग याला हुलकावणी दिली.

उत्तरार्धात 77व्या मिनिटाला प्रांजल भुमीजने डावीकडून रेनीयर फर्नांडिसला पास दिला. रेनीयरच्या क्रॉसपासवर रफीकने हेडिंग केले, पण चेंडू नेटमध्ये जात असतानाच ऑफसाईडचे निशाण फडकले.

सामन्यातील पहिली फ्री किक जमशेदपूरने मिळविली. दुसऱ्याच मिनिटाला 40 यार्ड अंतरावरून कार्लोसनेबॉक्समध्ये चेंडू मारला, पण मुंबईने आपले क्षेत्र सुरक्षित राखले. पाचव्या मिनिटाला जमशेदपूरने आणखी एकप्रयत्न केला. सहकारी जेरी माहमिंगथांगा याची धाव हेरत मारिओने हवेतून त्याच्या दिशेने चेंडू मारला, पणजेरीचे टायमिंग थोडक्यात कमी पडले. अमरिंदरने सरसावत चेंडू आधी ताब्यात घेतला. नवव्या मिनिटालाजेरीने उजवीकडून बॉक्समध्ये तिरकस चेंडू मारला. मारीओने झेपावत ओव्हरहेड किक मारायचा प्रयत्नकेला, पण तो चेंडूला स्पर्श करू शकला नाही.

मुंबईचा पहिला प्रयत्न 14व्या मिनिटाला झाला. मध्य क्षेत्रातून मारलेला चेंडू पाउलो मॅचादोसाठी हेडिंगची पुरेशी संधी मात्र निर्माण करू शकला नाही. पुढच्याच मिनिटाला मुंबईने पुन्हा मुसंडी मारली. आधी जमशेदपूरकडून खेळलेल्या सौविक चक्रवर्ती याने उजवीकडून बॉक्समध्ये चेंडू मारला, पण तो जमशेदपूरचा गोलरक्षक शुभाशिष रॉय याच्या अगदी जवळ गेला.

20व्या मिनिटाला सामन्यातील पहिले यलो कार्ड जमशेदपूरच्या टिरीला दाखविण्यात आले. त्याने मुंबईच्यामॉडौ सौगौ याच्या अंगाला धरून चेंडूवर ताबा मिळविला. रेफरी एल. अजित मेतेई यांचा निर्णय जमशेदपूरलाकठोर वाटला.

22व्या मिनिटाला मुंबईने संधी निर्माण केली. सेटपीसवर पाउलोने उजवीकडून कॉर्नर घेतला. त्याने ल्युचीयनगोऐन याच्या दिशेने चेंडू मारला. ल्युचियन याने उडी घेतली, पण जमशेदपूरच्या दोन खेळाडूंनी नाकेबंदीकेल्यामुळे तो हेडिंगमध्ये अचूकता साधू शकला नाही.

33व्या मिनिटाला पाउलोने फ्री कीक घेतली. मार्को क्लिसुराने आगेकूच करीत हेडिंगचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या खांद्याला लागला. शुभाशिषने उडी घेत डाव्या पायाने चेंडू थोपविला. तोपर्यंत ऑफसाईडचा इशारा झाला होता. 36व्या मिनिटाला संजू प्रधानने ल्युचियनला बॉक्समध्ये मैदानालगत पास दिला. हा चेंडू मारताना ल्युचियन संतुलन साधू शकला नाही. त्यामुळे चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला.

39व्या मिनिटाला जमशेदपूरला राजू गायकवाडच्या ढिलाईचा फटका बसू शकला असता. त्याला चेंडूवर ताबा मिळविता आला नाही. त्यामुळे सौगौला संधी मिळाली, पण तोपर्यंत टिरीच्या दक्षतेमुळे जमशेदपूरला दिलासा मिळाला. टिरीने सौगौला नियमाच्या चौकटीत राहून रोखले. 45व्या मिनिटाला ल्युचीयनने मैदानावर घसरत जेरीला रोखले.

उत्तरार्धात तिसऱ्याच मिनिटाला जमशेदपूरन उजवीकडून चाल रचली होती. कार्लोसच्या पासवर टिरीनेकेलेले हेडिंग ल्युचियनच्या अनुभवामुळे यशस्वी ठरले नाही.51व्या मिनिटाला प्रधानने रफाएल बॅस्तोसलाचांगला पास दिला, पण शुभाशिषने चपळाई दाखवित जमशेदपूरचे नेट सुरक्षित राखले.

71व्या मिनिटाला मुंबईची आणखी एक चाल जमशेदपूरच्या बचाव फळीने अपयशी ठरविली. ल्युचियननेदिलेल्या पासवर सौगौने चेंडू नियंत्रित केला. त्याने प्रांजल भुमीजकडे चेंडू मारला. प्रांजलने मारलेला चेंडू मात्रजमशेदपूरच्या युमनाम राजूने ब्लॉक केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)