मुंबईमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईमध्ये घाटकोपर परिसरामध्ये एक चार्टर्ड विमान आज दुपारी कोसळले. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मृत्यू झालेल्यांमध्ये ४ जण विमानात होते तर एक जण विमाना खाली येऊन मृत्य पावला. सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कामसुरू असलेल्या जागृती इमारतीवर विमान कोसळले.अशी माहिती सूत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई विमानतळाच्या २७ नंबरच्या मुख्य रनवे पासून ३ किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळले. घटनास्थळी लागलेली आग दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी विझविण्यात आल्याची माहिती अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)