मुंबई: साकीनाका येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका व्यक्तीकडून 50 लाख रूपयांच्या चलनातून बाद झालेल्या 500 रूपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अस्लम मिर्झा बेग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम मिर्झा बेग (वय 45, रा. बाबूभाई आयनेवली चाळ, गावदेवी डोंगरी, अंधेरी पूर्व, मुंबई) हा चलनातून बाद झालेल्या 500 रूपयांच्या जुन्या नोटा साकीनाका येथील मिठी नदीजवळील समिधा कॉम्पलेक्‍स येथे घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्याची झाडाझडतीत घेतली असता त्याच्याकडे सुमारे 50 लाख रूपये आढळून आले. या सर्व नोटा चलनातून बाद झालेल्या 500 रूपयांच्या नोटा होत्या. बॅंकिंग ऍक्‍टनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)