मुंबईत २६ जुलैची पुनरावृत्तीची शक्यता 

मुंबई: मुंबईतील पाऊस हा वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी ठिकठिकाणी साचले आहे. बऱ्याच ठिकाणी ३-४ फूटापर्यंत पाणी साचले आहे.  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

‘मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना व इतर शासकीय-अशासकीय नोकरदारांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगितलं आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री या परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत .
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा.

या वेळी काय कराल  

  • सर्वप्रथम तुम्ही कुठे आहात याची माहिती आपल्या जवळील व्यक्तीला द्या
  • शक्यतो लवकर घरी जाण्याचा प्रयन्त करा.
  • सतत तुमच्याबद्दल कळवत रहा.
  • पाण्याच्या  खोलीचा अंदाज येत नाही तोपर्यंत तेथे  जाण्याचा प्रयत्न करू नका .
  • आपल्या एका चुकीमुळे आपलं कुटुंब हे दुःखात सापडू शकतं.
  • कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका , हेल्पलाईन नं. ला त्वरित संपर्क साधा.(BMC नं -१९१६)

       

1 COMMENT

  1. Why All Government Bodies get alerted on emergency situation .Last two years Mumbaikar saved by Naturally less Rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)