मुंबईत १६ मजली इमारतीला भीषण आग; ४ जणांचा मृत्यू

मुंबई – मुंबईमधील परेल परिसरातील १६ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. दरम्यान, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

मुंबईमधील परेल परिसरात हिंदमाता चित्रपटगृहजवळ १६ मजली क्रिस्टल इमारतीला आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इमारतीच्या १२ व्या मजल्यावर लागली. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीत अडकलेल्या नागरिकांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)