मुंबईत होर्डिंग्ज न लावण्याचे आदित्य ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई – युवासेनेच्या कार्यकारणी बैठकीत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वाढदिवस, यश , निवड नियुक्ती अशा प्रसंगी शहरात होर्डिंग्ज न लावण्याचे आदेश दिले आहेत.

अशा होर्डिंग्जमुळे गाव आणि शहराच्या सौंदर्यात बाधा तर येतेच, त्याशिवाय स्थानिक जनतेच्या रोषालाही सामोरंही जावं लागतं. त्यामुळे अशा प्रकारची होर्डिंग्ज यापुढे न लावण्याचे आदेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)