मुंबईत साकारणार बॉलीवूड थीमपार्क

मुंबई, रायगडमध्ये 3 हजार 222 कोटी रूपये गुंतवणुकीची योजना तयार


पर्यटनातून रोजगार मिळणार

मुंबई – बॉलीवूडमुळे देशभरातील पर्यटकांना नेहमीच मुंबईचे आकर्षण राहिले आहे. फिल्मसिटी, फिल्म स्टुडिओ तसेच चित्रपट निर्मिती व्यवसायाशी संबंधित विविध संस्थांमुळे बॉलीवूडमध्ये मुंबईचे विशेष स्थान आहे.

यापार्श्वभूमीवर मायानगरी मुंबईत लवकरच बॉलीवूड थीमपार्क साकारले जाणार आहे. थीमपार्कसाठी 1 हजार 900 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यातील रोहा आणि अलिबागमध्ये नवे पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे.

मुंबईत बॉलीवूड थीमपार्क साकारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कांदिवलीतील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीच्या 21 एकर जागेवर बॉलीवूड थीमपार्क उभे करण्यास पर्यटन विभागाने मान्यता दिली आहे. पर्यटन विभागाने मुंबई आणि रायगड या दोन जिल्ह्यात खासगी सहभागातून 3 हजार 222 कोटी रूपये गुंतवणुकीची योजना तयार केली आहे. या गुंतवणुकीतून पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार असल्याची माहिती पर्यटन विभागाचे सचिव विजयकुमार गौतम यांनी दिली.

या थीमपार्कमध्ये भव्य स्टुडिओ, चित्रपट माध्यमाचे शिक्षण देणारी शाळा, सिनेमा संग्रहालय, एम्पी थिएटर तसेच तरण तलाव बांधण्यात येणार आहे. थीमपार्कच्या माध्यमातून जवळपास 900 तरूणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळणार असल्याचे विजयकुमार गौतम यांनी सांगितले.

रोह्यात समुद्रकिनारी असलेल्या 165 एकर जमिनीवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. 822 कोटी रूपये खर्चाच्या या योजनेतून इको टुरिझम, अँडवेंचर ट्रॅंक, विलेज, क्‍लब हाऊस आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर अलिबाग येथे हयात कंपनीकडून 24 एकर जमिनीवर रिसॉंर्ट उभारले जाणार आहे. या रिसॉंर्टमध्ये पर्यटकांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. पर्यटन विभागाच्या योजनेत सहभागी होणार्या कंपन्यांना जीएसटी सवलतीसह अन्य सवलती दिल्या जातील, अशी माहितीही विजयकुमार गौतम यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)