मुंबईत शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

मुंबई : कांदिवलीतील आकुर्ली येथील शिवसेना उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली. वैयक्तिक वादातून सावंत यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस तपास करत आहेत.

रात्री ९.३० च्या सुमारास आकुर्ली येथे दुचाकीवरुन दोन हल्लेखोर आले होते. या हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडून हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. जखमी झालेल्या सावंत यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सावंत यांच्यावर २००९ मध्ये देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र त्यात ते बचावले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)