मुंबईत शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक व फटाक्यांवर बंदी

मुंबई: बृहन्मुंबईत शांतता क्षेत्र वर्गीकृत करण्यात आली आहेत. या शांतता क्षेत्रामध्ये रूग्णालये/शैक्षणिक संस्था/धर्मस्थळ व न्यायालये यांचा समावेश आहे. शांतता क्षेत्रे ही 24 तास म्हणजेच दिवस व रात्रीसाठी शांतता क्षेत्र घोषित केले असल्याने या क्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर), संगीत वाद्य, फटाके इत्यादी वाजविण्यास संपूर्णपणे बंदी आहे.

शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी  आवश्यक परवाना घेऊन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, संगीत वाद्य यांचा वापर आवाजाची ठरविण्यात आलेल्या पातळीच्या उल्लंघनाशिवाय करता  येणार आहे.

कायद्यानुसार आवाजाची मर्यादा औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा 65 व रात्री 55 डेसिबल, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल व रात्री 40 डेसिबल अशी ठरविण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी मुख्य नियंत्रण कक्षातील 100 क्रमांक तसेच 738144144/7738133133 या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)