मुंबईत रेल्वे प्रवाशाकडून 17 किलो सोने जप्त

मुंबई – रेल्वेतील एका प्रवाशाकडून तब्बल 17 किलो सोने रेल्वे पोलिसांनी जप्त केले आहे. प्रवाशाकडे इतक्‍या मोठ्या प्रमाणात सापडलेले सोने पाहून रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सुर्यनगरी एक्‍स्प्रेसमध्ये प्रवास करत होता.

मनीष असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रकार टीसीच्या प्रसंगावधनामुळे उघडकीस आला. रेल्वे पोलिसांनी मनीषला सुरत पोलिसांच्या हवाली केले आहे. मनीष एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.

मनीष मुंबईहून सुरतकडे चालला होता. बोरिवलीहून त्याने प्रवासाला सुरुवात केली होती. सुर्यनगरी एक्‍स्प्रेसच्या एस-9 कोचमध्ये मनीष प्रवास करत होता. यावेळी बॅगेतून तो तब्बल 17 किलो सोने घेऊन जात होता. टीसीला मनीषच्या हालचालींवरुन संशय आल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता आपल्याला हे पार्सल सुरतला पोहोचवण्यास सांगितले होते. त्याबद्दल आपल्याला कमिशनही मिळणार होते, असे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. विशेष म्हणजे त्यालाही आपल्या बॅगेत इतके सोने आहे याची कल्पनाही नव्हती. पोलिसांनी सोने जप्त केले असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत सुमारे 5 कोटी 10 लाख रुपये आहे. हे सोने कोणाकडे पोहोचवण्यात येत होते. तसेच कोणी पाठवले होते यासंबंधी पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)