मुंबईत यंदा कारची विक्री 20 टक्क्यांनी घटली !

मुंबई : मुंबईत आता कारची विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांनी कमी झाली आहे, याविषयीची माहिती इंडस्ट्री सोर्सच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतावणाऱ्या पार्किंग समस्या, ट्रॅफिक समस्या यामुळे ही विक्री घटल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मुंबई, बंगळुरु, चेन्नई ह्या महानगरांमध्ये कार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मेट्रो सिटीत असलेला पार्किंगचा प्रश्न, ट्रॅफिक, ओला-उबरचा वाढता वापर, पेट्रोलचे वाढते भाव हे सगळे विचारात घेऊन, आता लोकांची कार विकत घेण्याची क्रेझ कमी झाली आहे. मुंबईची आताची परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे, त्यामुळे जागोजागी ट्रॅफिकची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय, जिथे लोकांना राहायला जागा नाही, अशा मुंबईत कार पार्किंग करायला जागेची समस्या आ वासून उभी आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)