मुंबईत ब्लॉकमुळे मार्गात अंशतः बदल

पुणे – मुंबईमध्ये मेट्रो लाईनचे काम हाती घेण्यात आले असून कळंबोलीदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. दि. 4 ते 17 डिसेंबर दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. यामुळे या कालावधीत पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या रेल्वे मार्गात अंशतः बदल असणार आहे. तर, दि. 9 रोजी पुणे-मुंबई प्रगती एक्‍स्प्रेस रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईमध्ये मेट्रो लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रगती एक्‍स्प्रेसच्या मार्गात बदल होणार असून दि. 4 ते 6, 11 ते 13 आणि तिसऱ्या टप्प्यांत 16 आणि 17 डिसेंबर रोजी प्रगती एक्‍स्प्रेस पनवेल मार्गे न जाता कल्याण मार्गे मुंबईला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)