मुंबईत बॉम्ब तयार करतानाच स्फोट ; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे आढळले

मुंबई: सुतळी बॉम्बच्या दारुपासून बॉम्ब तयार करणाऱ्या दोघा तरुणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार बॉम्ब तयार करत असताना झालेल्या स्फोटामुळे उघडकीस आला.

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात शनिवारी रात्री जोरदार स्फोटाचा आवाज झाला. या स्फोटाचा आवाज एक किलोमीटर परिसरात ऐकू आल्याचे रहिवासी सांगतात. स्फोटात दोघांपैकी एक तरुण जखमी झाला, तर आजूबाजूच्या झोपड्यांमधील सामानही खाली पडले.

स्फोटानंतर पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यात बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले. सर्वसाधारणपणे दहशतवादी अशा गोष्टी बॉम्बमध्ये वापरतात. सध्या हे सगळे स्फोटकसदृश्‍य पदार्थ तपासणीसाठी एफएसएलला पाठवण्यात आले आहेत.

दोघेही आरोपी मूळ पश्‍चिम बंगालचे रहिवासी असून मुंबईतील गरीब नवाज रोडवर नूरा बाजार भागात राहत होते. त्यांच्यापैकी अरजुल शेख हा 22 वर्षांचा आहे, तर दुसरा अल्पवयीन आहे.

दोघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. ही प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून एक पथक पश्‍चिम बंगालमध्ये पुढील तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)